Breaking News

रसायनीत पोलिसांचे पथसंचलन

मोहोपाडा ः वार्ताहर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्टोबरला होत असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘अ’ वर्गवारी असणार्‍या गावांत पोलिसांनी पथसंचलन केले. रसायनी पोलिसांचे पथसंचलन प्रारंभी जनता विद्यालय मोहोपाडा येथे घेण्यात आले. तेथून पथसंचलनास सुरुवात होऊन मुख्य रस्त्यावरून नवीन पोसरी व मोहोपाडा बाजारपेठ तेथून गावातून रस्त्यालगतच्या मुख्य मैदानावर पथसंचलन घेण्यात आले. यानंतर वावेघर येथे पथसंचलन करून तेथून रसायनी पोलीस ठाणे असे पथसंचलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पोलिसांचे पथसंचलन पाहिले. दरम्यान, सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडावी, नागरिकांना पोलीस बळाचा अंदाज व्हावा, यासाठी निवडणूक काळात हे पथसंचलन केले जाते. या वेळी खालापूर डीवायएसपी एक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोन, सहाय्यक पोलीस निरीक्षक एक, पोलीस उपनिरीक्षक दोन, सीआय एसएफ अधिकारी एक, पोलीस कर्मचारी 30, होमगार्ड 30, सीआय एसएफचे कर्मचारी 25, इतर पोलीस कर्मचारी 12, असे शंभरपेक्षा जास्त पोलिसांनी पथसंचलन केले. विधानसभा निवडणूक सुयोग्य, कायदा व सुव्यवस्थेच्या अधीन राहून शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल निश्चितपणे योगदान देईल, असे रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply