खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
अट्टल मद्यपी कोणत्या थराला जात असून फूलविक्रेत्याचा जवळपास पंधरा हजाराचा माल दारुड्यानी चोरून नेल्याची घटना खालापूरात घडली आहे.
गणेशोत्सवात फूलांचे दर कडाडले आहेत. हार, कंठी याचे दर वाढले असले तरी ग्राहक खरेदी करत आहेत. खालापूर शहरातील फूल विक्रेत्यानी ग्राहकांच्या मागणीनुसार विविध आकाराचे हार, दुर्वाची कंठी तयार करून माल ओसरीत ठेवला होता. रविवारी पहाटे मद्यपीची नजर तयार करून ठेवलेल्या मालावर गेली. त्याने सध्या फूलाचे मोल ओळखून हाराच बोचक चोरून नेला. सकाळी हार नेण्यासाठी गिर्हाईकांची रांग लागल्यानंतर ओसरीत माल नसल्याचे फूलविक्रेत्याच्या लक्षात आले.
मद्यपी खोपोली गावात हार विक्रीला बसल्याचे समजल्यावर फूलविक्रेत्यानी खोपोली गाठली. मद्यपीला देत पोलीस ठाण्यात न्यायला लागल्यावर हातापाया जोडत माफी मागितल्यामुळे सोडण्यात आले. हार असलेल बोचके जड असल्याने उचलता न आल्याने खेचत नेल्यामुळे माल खराब होवून फूलविक्रेत्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.