Breaking News

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांचा प्रचार जोरात चालू आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यात पाऊस काहीसा अडथळा आणत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी

(दि. 18) दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या तुरळक सरीदेखील पडल्या. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही पावसाची शक्यता आहे. 

21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्ष प्रचार करीत आहेत. 19 ऑक्टोबर हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही पाऊस पडल्यास प्रचारावर मर्यादा येऊ शकतात.

आठवडाभरापूर्वी जिल्ह्याच्या अनेक भागांत संध्याकाळच्या वेळी परतीचा पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह येणार्‍या पावसामुळे ग्रामीण भागात होणार्‍या सभा रद्द करण्याची वेळ उमेदवार आणि राजकीय पक्षांवर आली होती. याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसला. त्यांना जाहीर सभा रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पाऊस थांबला होता, परंतु शुक्रवारी पुन्हा वरुणराजाने हजेरी लावली. शनिवारीदेखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम आहे.

खारघरमध्ये आज मोटारसायकल रॅली

पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ शनिवारी

(दि. 19) सकाळी 10 वाजता खारघरमध्ये मोटारसायकल रॅली होणार आहे. सेक्टर 21मधील सचिन तेंडुलकर मैदानाजवळ या रॅलीला सुरुवात होणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply