नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्या सर्व सेवा यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीने पुरविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या हीींिीं://लळवले.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर ऑनलाइन सेवांकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापूर्वीच वसाहत विभागाशी संबंधित विविध सेवा जसे तारण ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे, कायदेशीर वारस हस्तांतरण, विविध प्रकारच्या परवानग्या प्राप्त करणे आदी सेवांचे सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने या सेवांशी संबंधित प्रक्रियांचा आढावा घेऊन सिडकोने ऑनलाइन शुल्क भरणा सुविधा, सादर कराव्या लागणार्या कागदपत्रांची संख्या कमी करणे, अर्जदारांना स्कॅन केलेली कागदपत्रे सादर करण्याची मुभा देणे, नागरिकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन देणे, डिजिटल स्वाक्षरी असलेल्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे ऑनलाइन पाठवणे असे निर्णय घेतले होते, परंतु बहुतांशी सेवा ऑनलाइन केल्यानंतरही सिडकोच्या नोडल कार्यालयांमधील नागरीसुविधा केंद्रांवर (उऋउड) ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पर्याय 31 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वसाहत विभागाच्या सेवांशी संबंधित प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या निर्णयाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळून आतापर्यंत 22 हजार 700हून अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, परंतु यापैकी केवळ 460 अर्जदारांनीच आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर केली, तसेच ज्यांनी आपले ई-मेल आयडी सादर केले, अशा केवळ 600 अर्जदारांनाच डिजिटल स्वाक्षरी असलेली ना-हरकत प्रमाणपत्रे त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवता आली.
वसाहत विभागाशी संबंधित विविध सेवा या ऑनलाइन पद्धतीनेच पुरविण्यात याव्यात व त्यासाठी अर्जदारांना वारंवार सिडको कार्यालयामध्ये येण्याची गरज भासू नये, या उद्देशाने सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी 1 नोव्हेंबरपासून सर्व नागरिक सुविधा केंद्रे बंद करण्यात येऊन यापुढे आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे वसाहत विभागाशी संबंधित परवानग्या वा ना-हरकत प्रमाणपत्रेही अर्जदारांच्या ई-मेल आयडीवरच पाठविण्यात येणार आहेत. याकरिता अर्जदार नागरिकांनी ऑनलाइन सेवा प्राप्त करताना आपले वैध ई-मेल आयडी द्यावेत. या ई-मेल आयडीवरच संबंधित अर्जदारांना परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्र, आदेश पाठविण्यात येतील याची नोंदही नागरिकांनी घ्यावी, असे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे.
वसाहत विभागाच्या सेवा ऑनलाइन करण्याच्या सिडकोच्या निर्णयामुळे अर्जदार नागरिकांच्या वेळेत बचत होण्यासह संबंधित सेवा त्यांना अधिक पारदर्शक, सुलभ व जलद गतीने मिळणार आहेत, असा विश्वास सिडको महामंडळाच्या वतीने प्रसिद्धिपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.