रामशेठ ठाकूर यांचे कामोठेत आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारार्थ कामोठे पोलीस स्टेशनजवळील मार्केटला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 18) भेट देत महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी करण्याचे आवाहन केेले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी.देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, भाजप नेते सुधाकर पाटील, रमेश तुपे, मार्केट अध्यक्ष बबलू गोवारी, पनवेल महापलिकेचे नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, प्रदीप भगत, नगरसेविका संतोषी तुपे, कुसुम म्हात्रे, युवानेते हॅप्पी सिंग, प्रकाश पाटील, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह प्रभाग 11, 12, 13 मधील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.