Breaking News

चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या!

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरातदेखील वॉकेथॉन रॅली काढण्यात आली. ‘वोट कर रायगडकर‘ , ‘चला मतदान करू या, लोकशाही मजबूत करू या‘, ‘आपका वोट आपकी ताकद‘, ‘एकच लक्ष्य मताचा हक्क‘,  ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो‘ या घोषवाक्यांनी अलिबाग शहर दुमदुमले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वॉकेथॉन रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. अलिबाग समुद्रकिनारा येथून रॅलीला सुरुवात झाली. रायगड जिल्हा परिषद कार्यालय, श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर, अलिबाग अर्बन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जा. र. ह. कन्याशाळा, युनियन बँक, नगररचना कार्यालय, बस स्टँड, रेवदंडा नाका, शेतकरी भवन, ठिकरुळ नाका, शिवाजी पुतळा, जामा मशीद, चावडी मोहल्ला, पोस्ट ऑफिस या मार्गाने अलिबाग बीच येथे रॅलीची सांगता झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, स्वीप नोडल अधिकारी सुनील जाधव, सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन शेजाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या वॉकेथॉन रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना, रिक्षा संघटना, कपडा व्यापारी संघटना, मेडिकल असोसिएशन, हातगाडी संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, नर्सिंग फेडरेशन, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी महासंघ, नगरपालिका चतुर्थ कर्मचारी संघटना, विविध विभागांचे शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, जेएसएम कॉलेजचे विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply