Breaking News

उरणला 21व्या शतकातील विकसित शहर बनविण्यासाठी आपण सज्ज होऊ -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना उरणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चार वेळा संधी दिली, तसेच 2014च्या निवडणुकीत उरणचा आमदार म्हणून मनोहर भोईर यांना उरणकरांनी संधी दिली, परंतु या आजी, माजी आमदारांनी उरणचे सोने करण्याऐवजी माती केली. म्हणून मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मैदानात उतरलो आहे, तरी 21व्या शतकातील विकसित उरण विधानसभा बनविण्यासाठी आपण सज्ज होऊ या, अशी हाक उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी उरणकरांना दिली आहे.

उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ उरण शहर येथे जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी (दि. 18) करण्यात आले होते. या सभेसाठी मैदान उरणकरांनी खचाखच भरले होते. या वेळी महेश बालदी यांनी पुढे सांगितले की, 400 कोटींची बँक बुडवू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे जेलमध्ये जाणार आहेत. ते काय तुमचा आमचा विकास करणार, तसेच उरणमधील एखाद्या भूमिपूजन किंवा उद्घाटन कार्यक्रमासाठी न येणारे उद्धवजी ठाकरे मात्र माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हरविण्यासाठी उरणात येत असतील, तर तो माझा निश्चित विजय आहे. त्यामुळे अब की बार एक लाख पार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठणे गरजेचे आहे.

या कर्मभूमीशी इनामी इतबारे सेवा करण्याचे काम महेश बालदी यांनी सुरू केले आहे. त्यामुळे कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या आज महेश बालदी यांना आपला पाठिंबा जाहीर करते, जे आजी-माजी आमदारांना जमलं नाही ते महेश बालदी यांनी या पाच वर्षांत करून दाखवले आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे अधुरे राहिलेले केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातील प्रश्न, तसेच तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण महेश बालदी यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू या, असे आवाहन दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या श्रृती म्हात्रे यांनी उपस्थितांना केले.

उरणचा खराखुरा विकास हे महेश बालदी करू शकतात, हे आपण त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. आज जी शिवसेना आपण पाहत आहात ती शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नाही. ती लाचार झालेल्या पदाधिकार्‍यांची आहे, तरी महेश बालदी यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डोळ्यात तेल घालून कामाला लागणे गरजेचे आहे, असे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी नमूद केले.

या वेळी सोनारी, बोरी उरणसह इतर गावातील अनेक शिवसेना, शेकापचे कार्यकर्ते यांनी महेश बालदी यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेऊन भाजपत प्रवेश केला, तसेच नाभिक महिला संघाच्या अध्यक्षा दीपाली शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांच्या वतीने महेश बालदी यांना पाठिंबा दिला. या वेळी व्यासपीठावर जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, राजाशेठ पडते, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, के. ए. म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, संजय गायकवाड, युवा नेते तथा महालण विभागाचे अध्यक्ष महेश कडू, निळकंठ घरत, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शेखर तांडेल, सुरेश पाटील, दौलतशेठ घरत, भुपेंद्र घरत, संगीता पाटील, संपदा म्हात्रे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, संदानंद गायकवाड, अनंत गायकवाड, चिंतामण गायकवाड, सरपंच दामूशेठ घरत, भूपेन घरत, पंडित घरत, देवेंद्र पाटील, विकी पाटील, शहराध्यक्ष कौशिक शहा, कामगार नेते जितेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष नितिन पाटील, कुलदीप नाईक, दिनेश तांडेल, प्रकाश कडू, रेखा पाटील, दर्शन घरत, सुनील पाटील, नरेश म्हात्रे, सरपंच निशान घरत, अ‍ॅड. पराग म्हात्रे, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका स्नेहल कासारे, यास्मीन फाईक गॅस, हेमंत म्हात्रे, समीर मढवी, प्रल्हाद पाटील, सरपंच ज्योती परशुराम म्हात्रे, सरपंच कविता हरेश भोईर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर लोकमत लोकनेता पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय …

Leave a Reply