Breaking News

मतदार जागृतीसाठी व्यावसायिक सरसावले; विविध ऑफर्स

मुंबई : प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रशासनाबरोबरच आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थांनीही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शक्कल लढवली आहे. ‘मतदान करा आणि पैठणीवर विशेष सूट मिळवा’ अशी ऑफर  येवला शहरातील कापसे पैठणीतर्फे देण्यात आली आहे. कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळच्या मालकांनी ‘मतदान केल्याची शाई दाखवा आणि 10 टक्के सूट मिळवा’ अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचे नियोजन केले आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने ‘मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या क्षेत्रातील रिसॉर्ट-हॉटेल्समध्ये सूट मिळवा’ अशी ऑफर दिली आहे, तर नाशिकच्या रामवाडी परिसरातील प्रभाकर सैंदाणे या सलून व्यावसायिकाने ’मतदान करा आणि 50 टक्के सूट मिळवा’ असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply