Breaking News

पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधान; धनंजय मुंडेंवर अखेर गुन्हा दाखल

बीड : प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामविकासमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली. यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापले आणि पंकजा मुंडे यांच्या संतप्त समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पंकजा मुंडे यांचे शेकडो कार्यकर्ते परळी पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. या वेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 509 आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply