Breaking News

फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा, सिंधूची दमदार विजयी सलामी

पॅरिस : वृत्तसंस्था

जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणार्‍या भारताच्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. पाचव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली हिचा सहजपणे अडथळा

पार केला.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला गेल्या तीन स्पर्धांमध्ये दुसर्‍या फेरीचाही अडथळा पार करता आला नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधूने आश्वासक खेळ करत मिशेल हिला 21-15, 21-13 असे नमवत आगेकूच केली आहे. सिंधूचा मिशेलविरुद्धचा हा पाचवा विजय ठरला आहे.

दुसरीकडे भारताच्या शुभंकर डे याने इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याचे आव्हान परतवून लावत दुसर्‍या फेरीत मजल मारली आहे. जागतिक क्रमवारीत 42व्या स्थानी असलेल्या शुभंकरने 17व्या क्रमांकावरील सुगिआर्तोला 1 तास 18 मिनिटे रंगलेल्या लढतीत 15-21, 21-14, 21-17 असे हरवले.

साईप्रणीतची मुसंडी

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतने एका क्रमांकाने मुसंडी मारत कारकिर्दीतील  सर्वोत्तम अकराव्या स्थानी झेप घेतली आहे. जगज्जेत्या सिंधूने आपले सहावे स्थान कायम राखले आहे. किदम्बी श्रीकांतच्या क्रमवारीत घसरण झाली असून, तो आता दहाव्या स्थानी पोहोचला आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक …

Leave a Reply