Breaking News

सिडको महामंडळात दक्षता जनजागृती सप्ताह

नवी मुंबई : सिडको वृत्त

केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये 28 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2019 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, सिडको मुख्यालयासह सिडकोची नोडल कार्यालये, नवीन शहर कार्यालये येथे हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना इमानदारी-एक जीवनशैली ही आहे.

केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सिडको महामंडळामध्येही दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 30 ऑक्टोबर, 2019 रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे कर्मचारी व अधिकार्‍यांना सत्यनिष्ठेची शपथ दिली. या वेळी माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. या वेळी सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या कालावधीत 31 ऑक्टोबर 2019 रोजी ‘इमानदारी-एक जीवनशैली’ या विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच या कालावधीत नवी मुंबई व नवीन शहरे प्रकल्प परिसरातील सिडको कार्यालयांच्या दर्शनी भागांत भ्रष्टाचार निर्मूलनविषयक जागृती निर्माण करणारी भित्तीपत्रके लावण्यात येणार आहेत, तर 01 नोव्हेंबर 2019 रोजी सिडको भवन येथे सुप्रसिद्ध वक्ते संदीप सावंत हे वरील विषयावर सिडको कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply