Breaking News

कर्जतमध्ये रामशेज किल्ल्याची प्रतिकृती

कर्जत : प्रतिनिधी            

दिवाळीनिमित्ताने कर्जतमधील पाटील आळी मित्र मंडळाने  या वर्षी  किल्ले रामशेजची (नाशिक) प्रतिकृती साकारली आहे.

 पाटील आळी मित्र मंडळाचे बाल सदस्य गेल्या 12 वर्षांपासून दर दिवाळीमध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती साकारतात. विशेष म्हणजे ज्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करावयाची आहे, त्या किल्ल्यावर जाऊन मंडळाचे बाल सदस्य त्या किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती जाणून घेतात आणि दिवाळीत त्या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारतात.

नाशिक-पेठ रस्त्यावर पंचवटीपासून 10 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. रामशेज इतर किल्ल्यांप्रमाणे दर्‍याखोर्‍यांत, जंगलात अथवा खूप उंचीवर नाही. एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर त्याने आपले बलदंड शरीर झोकून दिले आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे. किल्ल्याजवळच राम मंदिर आहे. तेथे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. पाण्याचे कुंड आणि एक बोगदाही आहे. सीता गुंफेतून रामशेजला जाण्यासाठी बोगदा असल्याचेही म्हटले जाते, मात्र सध्या तो बंद आहे.

पाटील आळी मित्र मंडळाच्या बाल कलाकारांनी यंदाच्या दिवाळीत याच रामशेज किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.

याकामी त्यांना प्रशांत कारूळकर यांचे सहकार्य व मंडळाचे सदस्य श्रवण गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply