पेण : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष पेण शहर आयोजित एक सेल्फी बाप्पा सोबत आणि घरगुती गणेश सजावट स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत निंबरे परिवार (कोळीवाडा) आणि एक सेल्फी बाप्पा सोबत या स्पर्धेत यश किशोर बांदिवडेकर (एसटी स्टॅन्ड जवळ) यांचा प्रथम क्रमांक आला आहे.
नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील व भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. या वेळी कौस्तुभ भिडे, राकेश म्हात्रे व अष्टविनायक मंडळ सदस्य उपस्थित होते. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रशांत प्रकाश कुलकर्णी (बालाजी ग्रीन सिटी) यांचा दूसरा, सपना अमोल जाधव (कवंढाळ तळे) यांचा तिसरा क्रमांक आला. तर एक सेल्फी बाप्पा सोबत या स्पर्धेत प्राची प्रमोद झेमसे (हनुमान आळी) आणि राजू सत्यनारायण पिचिका (लोकमान्य हौसिंग सोसायटी ) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.