Breaking News

वाढलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

उरण : प्रतिनिधी

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर अर्ध्यापेक्षा जास्त गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याकडून  छाटण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले बहुतांशी रस्ते हे उरणच्या पूर्व विभागाशी जोडलेले आहे. यामध्ये चिरनेर-आवरे मार्ग खोपटा-केळवणे मार्ग या मार्गावरील रस्त्यावरील दोन्ही बाजूला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. हे गवत एवढे वाढले आहे की गवताने अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापला गेलामुळे रस्ता पूर्ण आखूड झाला. त्यामुळे त्या रस्त्यावर दोन रिक्षांना ओलांडणेही मुश्कील झाले, तसेच समोरून येणारे वाहन या वाढलेल्या गवतामुळे दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील जनतेला कोणत्या ना कोणत्यातरी समस्येला सामोरे जावे लागत आहे. कधी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात, तर कधी सततची होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरी या रस्त्यांवर वाढलेले गवत सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित छाटावे आणि पांढरे पट्टे मारण्यात यावे अन्यथा या रस्त्यावर अपघात झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल आणि सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असतील, असे जनतेतून बोलले जात आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply