Breaking News

बहुउद्देशिय गाळे वापराविना पडून

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर 16-ए मधील नाल्यावर 30 किओस्क (गाळ्यांचे) बांधकाम केले आहे, मात्र मागील बरीच वर्षे हे गाळे वितरित करण्यात न आल्याने त्यांच्या लोखंडी दरवाजांना गंज चढला आहे. भविष्यात या गाळ्यांची आणखीन दुरवस्था होऊ नये म्हणून हे गाळे लवकरात लवकर  वापरात आणावे, अशी मागणी होत आहे.

सेक्टर 16-ए मधील नाल्यावर विविध व्यवसायिक कारणांसाठी 30 कीओस्क (गाळ्यांचे) बांधकाम करण्यात आले आहेत. सुरुवातीला पाणी, टेलिफोन, वीज, मालमत्ता कर, उपकर बिल भरणा केंद्र, सीएफसी, पालिका आरोग्य शिबिर, परिवहन नियंत्रण कक्ष, पालिकेचे रोकड आणि बँक भरणा केंद्र, घनकचरा विभाग निवारा शेड, विद्युत मीटर खोली, महानगर गॅस बिल भरणा, देखभाल विभाग कार्यालय आणि वाहतूक पोलीस चौकीसाठी वापरण्यात येणार होते, मात्र ज्या वापरासाठी किऑस्कची परवानगी दिली होती. त्याबाबत याचा वापर करता येत नसल्याने आणि वाणिज्य वापर करता येत नसल्याने पालिकेच्या धोरणानुसार अपंगांना हे किऑस्क देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अंपगांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने हे गाळे त्यांना वितरित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त रामास्वामी एन. यांनी सर्वसाधारण सभेत आणला होता, पंरतु हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. या गाळ्यांची  सध्या दुरवस्था झाली आहे. या गाळ्यांचे शटर गंजले असून, काही शटर निखळले आहेत, तर काही शटर गळून खाली पडले आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी दुरवस्था होऊ शकते.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply