Breaking News

एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्‍या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य गेली 15 वर्षे ते करत आहेत.

एड्सचा शोध लागून 40 वर्षे झाली, तरीदेखील या आजारासंबंधी सामाजामध्ये मोठ्या प्रमाणात कलंकित दृष्टिकोन व गैरसमज आहेत. यामुळे रुग्णाला आपल्याच कुटुंबातून वाळीत टाकलं जातं. काही भाऊदेखील बहिणीकडे भाऊबीजेला जात नाहीत. अशा बहिणींचा हा दिवस आनंदी  करण्याच्या हेतूने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.आज माझ्या या बहिणींना भाऊबीजेची भेट देऊन त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्याचे भाग्य मला लाभत आहे. त्या या आजरात आपले खडतर जीवन जगत आहेत. या प्रसंगात शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे अरविंद पाटील यांनी सांगितले, तसेच आपण सर्वांनी एड्स आजाराने बाधितांचा द्वेष न करता त्यांना प्रेमाची वागणूक द्यावी, असे अरविंद पाटील यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply