नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्याआधी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावरच्या फैसल्याआधी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्धसैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या बर्यापैकी आहे त्या भागात सुरक्षा तैनात करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. फैजाबादच्या पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम समाजाला पुरेशी सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचा विश्वास दिला आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या भागात आधीपासूनच पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper