Breaking News

चेन स्नॅचिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी, खारघर पोलिसांना महिलांनी दिले निवेदन

खारघर : प्रतिनिधी

खारघर शहरात नजीकच्या काळात चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्वच सेक्टरमध्ये वाढले आहेत. संबंधित प्रकाराने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची मागणी शुक्रवारी (दि. 1) खारघर भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी केली. भाजपच्या महिला मोर्चाच्या चिटणीस बिना गोगरी यांनी यासंदर्भात खारघर पोलिसांना निवेदन दिले. या वेळी चेन स्नॅचिंगला बळी पडलेल्या शकुंतला काळे (64) या ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होत्या. गुरुवारी दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येताना रात्री 9.15च्या दरम्यान सेक्टर 19 येथील काळे यांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. या वेळी या परिसरातील पथदिवे बंद असल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत ही चोरी केली. शहरात अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून सीसीटीव्ही देखील कार्यान्वित नसल्याने चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात संबंधित विभागाशी समन्वय साधणे गरजेचे असल्याचे मत या वेळी बिना गोगरी यांनी व्यक्त केले. चेन स्नॅचिंगच्या घटना टाळण्यासाठी विविध सेक्टरमध्ये पोलिसांची पेट्रोलिंग वाढविण्याची मागणीदेखील करण्यात आली. या वेळी अंजू आर्या, स्मिता आचार्य, वैशाली प्रजापती आदी महिलादेखील या वेळी उपस्थित होत्या.

Check Also

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …

Leave a Reply