पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील नानोशी ग्रामपंचायतमधील मोसारे गावात पनवेल टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने खर्या अर्थाने गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल टेनिस समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील (रोहिंजण), उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे (ओवळे), कुंडेवहाळ येथील प्रख्यात आणि दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे मयूर भोईर, वरचे ओवळे येथील राम घरत, तसेच कुंडेवहाळ गावातील वसंत भोईर, जे. के. भोईर, राम भोईर, विराज गायकवाड, प्रकाश वास्कर, सागर, शैलेश, रतन आदी टेनिसपटू, जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे -सचिन पाटेकर, सर्व नवतरुण, वरिष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. सन 2018 मध्ये पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनची स्थापना झाली. पहिल्या वर्षात शिरवली विभागातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप केले होते आणि त्यानंतर दुसर्यांदा मोसारे विभागात क्रीडा आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मयूर भोईर शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने असोसिएशनमधील सर्व सभासदांना प्रेमाची भेट म्हणून टी-शर्ट देण्यात आले. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम वर्षानुवर्षे राबविण्यात येतील, असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.