Breaking News

खालापुरात अवैध बारवर छापा; दीड लाखाची दारू जप्त, दोघांना अटक

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कलोते धरणाच्या परिसरात असणार्‍या आलिशान बंगल्यावर धाड टाकून उत्पादन शुल्क विभागाने तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा देशी व इलायती बनवाटीचा अवैध दारू साठा जप्त केला असून, दोघा जणांना ताब्यात

घेतले आहे.

खालापुरातील कलोते धरणाजवळ असलेल्या कॅम्प मॅक्स या अलिशान बंगल्यात अवैधरीत्या मेनू कार्ड छापून वाईन, व्हिस्की, तसेच उंची ब्रँडच्या दारूची विक्री केली जाते, या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल येथील अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद पवार, निरीक्षक गोगावले, दुय्यम निरीक्षक आर. एम. चाटे, गायकवाड नरहरी, अपर्णा पोकळे, श्रीमती मोरे, सुधीर मोरे यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी पर्यटकांना विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आलेल्या विदेशी ब्रँडच्या ब्लॅक अँड व्हाईट स्कॉच विस्की, अबस्लुट व्होडका, जॅक डॅनियल विस्की, बकार्डी व्हाईट रम, सिमरन व्होडका, ब्लेंडर फाईड, ब्ल्यू रिवंड जीन, ओल्ड मंक रम, किंगफिशर प्रीमियर बीयर, सुला वाईनचे ब्रँड, तसेच देशी दारू, स्कॉच व्हिस्की असा एकूण एक लाख 11 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला व हबीबुल खान (वय 36, रा. कॅम्प मॅक्स रिझल्ट कॅम्प साईट, कलोते) आणि  सोनी मांडलकर (वय 36, रा. खोपोली) या दोन इसमांना ताब्यात घेतले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply