Breaking News

खालापुरात दुचाकीचा अपघात

आरोग्य विभागातील अधिकारी गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी

वावोशी येथून खालापूरकडे येत असताना वडवळ गावाजवळ खडीवरून दुचाकी घसरून बुधवारी (दि. 6) दुपारी झालेल्या अपघातात पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर जोशी गंभीर जखमी झाले. आपघातग्रस्त ग्रुपने तातडीने घटनास्थळी जावून जोशी यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केले आहे. खालापूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर जोशी हे वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रातून काम आटपून बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खालापूरकडे येत होते. वडवळ गावाजवळ त्यांची दुचाकी खडीवरून घसरून आपघात झाला. यामध्ये जोशी यांच्या हाता-पायाला व डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याचे वृत्त समजताच आपघातग्रस्त टिमचे विजय भोसले व राजेश पारठे यांंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी जोशी यांना एमजीएम रूग्णालयात दाखल केले. व सदर घटनेची माहिती त्यांच्या कुटूंबियांना दिली. दरम्यान, जोशी यांची प्रकृती सुधारणा होत असल्याचे एमजीएम रूग्णालयाकडून सांगण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply