Breaking News

कुष्ठरोग्यांकरिता मलमपट्टी सुविधा द्यावी

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वेस्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही. शांतिवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य होत नाही. शिवाय प्रवासाने जखमा खराब होऊन त्यातून पाणी येते. तरी पनवेल महानगरपालिकेने या रुग्णांची व्यथा जाणून त्यांना मलमपट्टी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कुष्ठरुग्णांकरिता मलमपट्टी सुविधा सदर वसाहतमध्ये आठ दिवसांतून दोनदा करता यावी. त्यासाठी योग्य ते डॉक्टर अथवा सेवक, सेविकेची व्यवस्था करावी. या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply