Breaking News

‘मिशन शिवडी-न्हावा शेवा लिंक’

पाच हजार कामगारांची प्रकल्पासाठी नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने वेगाने हालचाली सुरू केल्या असून, या प्रकल्पावर पाच हजार तंत्रज्ञ व कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सप्टेंबर 2022पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे. मुंबईच्या दक्षिण भागातील शिवडीपासून न्हावा शेवापर्यंत जाणार्‍या 22 किमी लांबीच्या या पुलामुळे मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होणार आहे. सध्या मुंबईतून रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी कमाल अडीच तास लागतात. ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ तासाभरात हे अंतर कापता येईल. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने पाच हजार कामगार नियुक्त केले असून त्यापैकी 4300 कुशल कामगार आहेत, तर 700 तंत्रज्ञ आहेत. प्रकल्पाचे 14 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यााठी टप्पे पाडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 10.4 किमीचा पूल बांधण्यात येणार असून त्याचे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात 7.8 किमीचा पूल असून हे काम 12 टक्के पूर्ण झाले आहे. तिसर्‍या टप्प्यात 3.8 किमीचा व्हाया डक्ट उभारला जात असून, हे काम 11 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी 17 हजार 843 कोटी रूपये खर्च येणार आहे.

असा असेल प्रकल्प

22 किमीचा सागरी मार्ग

समुद्रातील पुलाची लांबी 16.5 किलोमीटर

नवी मुंबई येथे जमिनीवरील पुलाची लांबी 5.5 किलोमीटर

एकूण सहा मार्गिका

मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडणी

नवी मुंबई विमानतळाला जोडणी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जोडणी

रेवस बंदराला जोडणी

मुंबई-पनवेल अंतर 15 किमीने कमी होईल

नवी मुंबई, द्रोणागिरी, उलवे आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला हातभार

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply