रेवदंडा : प्रतिनिधी
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्ली येथे ईद ए मिलाद सणानिमित्त पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक घेण्यात आली. सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन जैतापुरकर यांनी या बैठकीत केले. मोहल्ला कमिटीच्या या बैठकीला बोर्ली येथील मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांनी उपस्थित मुस्लिम बांधवाशी संवाद साधला.