Breaking News

तळोजा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त

तळोजा एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन संपादनाच्या प्रश्नासंदर्भात दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक बुधवारी (दि. 21) प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासोबत झाली. संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

तळोजा एमआयडीसीसाठी कानपोली, चिंध्रण या गावांमध्ये भूसंपादनाचे काम सुरू आहे. याबाबत स्पष्टता नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून एमआयडीसी प्रकल्पग्रस्त समितीने सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीकडे धाव घेतली असता संघर्ष समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात बैठक बोलाविली होती.

या बैठकीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील, सचिव महेंद्र घरत, निमंत्रक अतुल पाटील, अरुणशेठ भगत, काशिनाथ पाटील, रवी पाटील, सुरेश पाटील, सुधाकर पाटील, जे. डी. तांडेल, एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, प्रल्हाद केणी, कृष्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी जमिनीचे भाव, मोबदला यावर प्रकल्पग्रस्तांसाठी पूरक तोडगा काढण्यात येईल असे ठरले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply