Breaking News

खोपोलीत खोकला व तापाने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी

अवकाळी पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेला उष्मा व वेगात वाहणार्‍या वार्‍यामुळे हवामानात दरदिवशी बदल होत आहे. खोपोली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उडाल्याने सर्वच ठिकाणी धुळीचा लोट निर्माण होत आहे. त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढून खोपोली परिसरातील हवा काही प्रमाणात प्रदूषित झाली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून, विचित्र खोकला व तापाने खोपोलीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर हैराण झाले आहेत. सध्या खोपोली व परिसरातील बहुसंख्य रुग्णालये व दवाखान्यांत विचित्र खोकला व तापाचे रुग्ण तपासणी व  उपचारासाठी दाखल होत आहेत. याबाबत डॉक्टरांकडून काही आरोग्य सल्ले देण्यात आले आहेत.  हवामान मध्ये होणारा बदल व वातावरणातील वायू प्रदूषण व धुळीचे वाढलेले प्रमाण मुळे खोकला व तापची लागण होऊ शकते. यापासून बचाव करण्यासाठी बाहेरचे तळलेले खाद्य पदार्थ सेवन करण्यास टाळावे .तसेच दुचाकी किंवा उघड्या वाहनातून प्रवास करतांना धूळ रोखण्यासाठी चेहर्‍यावर रुमाल अथवा तत्सम स्वच्छ कपडा बांधावा. सकाळी संध्याकाळी झोपण्यापूर्वी कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. तरीही त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन योग्य तपासणी व उपचार करून घ्यावा, असे खोपोली नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. संगीता वानखेडे यांनी सांगितले.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply