पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमिक विद्यालयाने अत्यंत नेत्रदीपक यश प्राप्त केले. सीकेटीचे 38 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
यामध्ये कौशल मनोज गोसावी (पाचवी), ऋतुजा नरेंद्र म्हात्रे (पाचवी), ऋत्विक शिवदास पाटील (पाचवी), प्रचिती संतोष घोलप (पाचवी), जय सूर्यकांत घोडेकर (पाचवी), ऋतुजा मोहन ठाकूर (पाचवी), ईशान मनोज भोईर (पाचवी), अदित्य अशोक पवाळे (पाचवी), वैष्णवी अनिल देवळे (पाचवी), अवंती अमोल पाटील (पाचवी), हर्षदा राजेंद्र तांबे (पाचवी), निकीता सैबन्ना मशाल (पाचवी), प्रियंश भागवंत कारंडे (पाचवी), अपुर्वा अंकीरेड्डी वाल्लमरेड्डी (पाचवी), आर्या गंगाराम सुर्वे (पाचवी), स्वस्तिका सुहास भिसे (पाचवी), सैम्या सोमेश चटर्जी (पाचवी), संचिता सचिन खोपकर (आठवी), शुभदा संतोष देशमुख (आठवी), अदित्य आनंद कुलकर्णी (आठवी), आरती मोहनलाल गुप्ता (आठवी), यश आनंत पांडव (आठवी), वैष्णवी कृष्णा रेड्डी (आठवी), स्वरा विश्वास पवार (आठवी), वैष्णवी हनुमंत झांजे (आठवी), अर्थव रवींद्र खडतर (आठवी), सोहम मिलिंद मापगावकर (आठवी), अनवेष गोपलकृष्णा संगम (आठवी), अर्थव अविनाश चव्हाण (आठवी), समृद्धी प्रकाश पुरोहित (आठवी), सलोनी संजय बदाद (आठवी), प्रतीक्षा दिनेश नायक (आठवी), सानिका मंगेश जाधव (आठवी), अर्थव उत्तम बेर्डे (आठवी), अनन्या पंकजकुमार झा (आठवी), श्रेष्ठी संगमेश्वर पाटील (आठवी), सिद्धी चांगदेव भोसले (आठवी), स्वरनाली गंजेंद्र पाटील (आठवी) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना सीकेटी इंग्रजी माध्यमाच्या मेहनती शिक्षकांनी, पर्यवेक्षिका नीरजा मॅडम आणि मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक़, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.