Breaking News

पनवेल पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 12) झाली. या वेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष दीपक महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. उपस्थित सभासदांनी एकमताने साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची सन 2019-2020 या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी निवड केली.

या वेळी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात कार्याध्यक्षपदी संजय कदम, उपाध्यक्षपदी रत्नाकर पाटील, सरचिटणीसपदी मंदार दोंदे, सहचिटणीसपदी विशाल सावंत, खजिनदारपदी केवल महाडिक, सहखजिनदारपदी सुधीर पाटील, प्रसिद्धीप्रमुख म्हणून राज भंडारी, तसेच साहिल रेळेकर, सल्लागार माधव पाटील, सुनील पोतदार, दीपक महाडिक, सय्यद अकबर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य अरविंद पोतदार, विवेक पाटील, अनिल भोळे, सुभाष वाघपंजे, मयूर तांबडे, गणपत वारगडा, सुबोध म्हात्रे, सुनील कटेकर, असीम शेख, शशिकांत कुंभार, दीपक घोसाळकर यांची निवड करण्यात आली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply