Breaking News

नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या नवीन इमारतीचे रविवारी लोकार्पण

कर्जत : बातमीदार

विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या नवीन वास्तूचे लोकार्पण रविवारी (दि. 17) मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्या मंदिर मंडळाने 1951 मध्ये नेरळमध्ये माध्यमिक शाळा केली. या शाळेत 1993मध्ये कनिष्ठ महाविद्यालय तर 2008मध्ये कला व वाणिज्य शाखेचे वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. साधारण 3500 विद्यार्थी विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. जागेची कमतरता भासत असल्याने मंडळाने 2017मध्ये भव्य इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील आठ कोटी रुपये खर्चाचे चार मजले सर्व सोयीसुविधासह तयार झाले आहेत. 30 हजार चौरस फुटाचे बांधकाम करून 27 खोल्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात 18 वर्ग खोल्यासह संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालय, कार्यालये, शिक्षक-प्राध्यापक कक्ष यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व मजल्यांवर स्वच्छतागृह, अग्नीशमन यंत्रणा व दोन उदवाहनांची सुविधा असून कँटीनदेखील त्या इमारतीमध्ये आहे. येत्या रविवारी मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचे हस्ते या वास्तूचे लोकार्पण केले जाणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply