Breaking News

दिवाळीचा फोटो शेअर करणे इशांत शर्माला पडले महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खेळाडूंच्या फॅन्सनीही त्यांचे हे फोटो लाईक आणि शेअर केले आहेत, पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मात्र दिवाळीचे फोटो शेअर करून चांगलाच गोत्यात आला आहे.

इशांत शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला. इशांतने हा फोटो टाकल्यानंतर लगेचच त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. कारण इशांतने टाकलेल्या या फोटोमध्ये त्याच्या घरात आसाराम बापूचा फोटो दिसत आहे.

आसाराम बापू सध्या बलात्काराच्या आरोपाखाली जोधपूरच्या जेलमध्ये आहे. इशांत शर्माचे कुटुंब आसारामचे भक्त होते. त्यामुळे हा फोटो शेअर केल्यामुळे इशांत शर्माला ट्रोल

करण्यात आले. अखेर इशांतने हा फोटो डिलीट केला. फोटो डिलीट केल्यानंतर त्याने हाच फोटो क्रॉप करून पुन्हा एकदा शेअर केला.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply