Breaking News

घारापुरीवरील पुरातत्त्व विभागाच्या तिकीट कार्यालयाचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील जगविख्यात असलेल्या घारापुरी बेटावरील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या तिकीट कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले. घारापुरी येथे भारतीय पुरातत्त्व विभाग आकारत असलेल्या पर्यटक कराच्या कार्यालयाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या वेळी भारतीय पुरातत्त्व विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर आदी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply