Breaking News

शासकीय नोकरीमुळे सकारात्मक सामाजिक बदल -लेंगरेकर

पनवेल ः प्रतिनिधी

शासकीय नोकरीत रुबाबाबरोबरच अधिकारही प्राप्त होतात. त्यामुळे आपण सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणू शकतो, असे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना पनवेल येथे बुधवारी (दि. 3) प्रतिपादन केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पनवेल आणि स्पेक्ट्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र बँकेचे अधिकारी अरविंद मोरे, स्पेक्ट्रमचे महाव्यवस्थापक सुनील पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त माधवी सुर्वे उपस्थित होत्या. बेरोजगारीमुळे आजचा तरुण भरकटलेला आहे. त्याने वेळेचे नियोजन करून उमेदीचा काळ वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला. यावेळी महाराष्ट्र बँकेचे अरविंद मोरे, स्पेक्ट्रमचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply