नवीन पनवेल : पतंजली योग समितीच्या वतीने आणि नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या विशेष सहकार्याने सेक्टर 15 येथे आयोजित सातदिवसीय निःशुल्क योग शिबिराचा समारोप शनिवारी करण्यात आला. या वेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अमित जाधव यांच्या शुभेच्छा
उरण : नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांना रायगड जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद अमित जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
‘आपला गाव आपला विकास’ या अंतर्गत गण विचुंबे पंचायत समिती बैठक
पनवेल : पंचायत समितीमार्फत 2020-21 ते 2024-25चा ग्रामपंचायतीचा आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा ‘आपला गाव आपला विकास’ या अंतर्गत गण विचुंबे पंचायत समिती बैठक शनिवारी दुपारी झाली. या वेळी जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, विचुंबे, वागणी तर्फे वाजे, देवद ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक आणि पं. स.चे अधिकारी, सभापती उपस्थित होते. या वेळी जि. प. सदस्य, गटनेते अमित जाधव, पं. स. विस्तार अधिकारी श्री. म्हात्रे, ग्रामसेवक, सभापती यांनी मार्गदर्शन केले.
शांतीकुटी मठ ते आळंदी दिंडी संजीवन समाधी सोहळ्यासाठी रवाना
तळोजा-मजकूर (ता. पनवेल) ः स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामनबाबा महाराज, सद्गुरू सावळारामबाबा, सद्गुरू आप्पा माऊली यांच्या आशीर्वादाने शांतीकुटी मठ ते आळंदी अशी दिंडी संजीवन समाधी सोहळ्यासाठी रवाना झाली. दिंडीचालक हभप रामदासबाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्यात भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस प्रल्हाद केणी, नगरसेवक संतोष भोईर, नंदकुमार म्हात्रे, संतोष पाटील व परिसरातील वारकरी, कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भाजप युवा नेते संदेश चौतमोल यांना विवाहानिमित्त भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिल्या शुभेच्छा
नवीन पनवेल : भाजप युवा नेते संदेश चौतमोल यांना विवाहानिमित्त भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, मयूर कदम, अक्षय सिंह आदी उपस्थित होते.