Breaking News

आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची एण्ट्री!

हैदराबादच्या नटराजनला लागण; संपर्कातील विलगीकरणात

दुबई ः वृत्तसंस्था
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाली असून सध्या नटराजनसह त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना आयसोलेट (विलग) करण्यात आले आहे. दरम्यान, हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील बुधवारी (दि. 22) होणारा सामना खेळविण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, टी नटराजन आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याने स्वतःला उर्वरित संघापासून वेगळे केले आहे. आतापर्यंत त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीय. बाकीच्या संघाचीही कोरोना चाचणी करण्यात आली. यात संपर्कात आलेल्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या नटराजन आणि त्याच्या संपर्कात आलेला खेळाडू विजय शंकर तसेच इतर कर्मचार्‍यांना आयसोलेट करण्यात आले असून वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply