Breaking News

क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी खेळतोय गोल्फ

रांची : वृत्तसंस्था

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासूनच क्रिकेटपासून दूर आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत असते, तर दुसरीकडे धोनी हा नेहमीच ‘कूल’ असतो. नुकताच धोनीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसत आहे.

केदार जाधवने सोशल मीडियावर धोनीसोबतचा फोटो शेअर केला, ज्यात आरपी सिंह दिसत आहे. आरपी सिंहनेही या फोटोला रिट्वीट केले. जुन्या सहकार्‍यांसोबत वेळ घालवणे खेळापेक्षाही जास्त चांगले होते, असे आरपी सिंह म्हणाला. यापूर्वी धोनी त्याचे शहर रांचीमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दिसत होता. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा कमबॅकची तयारी करत असल्याचा अंदाज लावण्यात आला.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply