Breaking News

पनवेल परंपरा फेस्टिवलमधे ‘सूर प्रभात’

खारघर : रामप्रहर वृत्त
प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पनवेल परंपरा फेस्टिवलमधे सूरप्रभात या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या संगीतसभेचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ गायकांचे शास्त्रीय गायन रसिकांना ऐकायला मिळावे, तसेच नवोदित गायकांना व्यासपीठ मिळून शास्त्रीय संगीताची परंपरा अव्याहत सुरू रहावी या उद्देशाने प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. मेघनाथ कोल्हापुरे, पं. मिलिंद गोखले, मुदिता सोनावणे, सई मराठे, वर्षा सहस्रबुद्धे, निकिता दरेकर, संध्या घाडगे, मंदार भिडे, ओजस जोशी, अनिता कुलकर्णी, अनिल खोसरे, वीणा कुलकर्णी, मधुरा सोहनी, मेधा इंगळे आदींनी विविध रागांचे सादरीकरण केले. त्यांना प्रतिभा कुलकर्णी, देवेन मराठे, नंदकुमार कर्वे यांनी संवादिनी, तर विनायक प्रधान, योगेश गायकवाड, धनंजय खुटले, रमेश गोंधळे, आदित्य उपाध्ये, संतोष खरे आदींनी तबलासाथ केली. प्रसिद्ध निवेदिका सुप्रिया ताह्मणकर यांनी आपल्या बहारदार शैलीने कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन केले.
पनवेलची शास्त्रीय संगीताची जुनी परंपरा टिकवून ठेवण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी फेस्टिवलचे आयोजक किशोर पांडे व त्यांच्या सहकार्‍यांचेे कौतुक केले. चंद्रकांत मने, मिलिंद गोखले, संध्या घाडगे, मधुरा सोहनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply