Breaking News

देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

रविवारी (दि. 17) सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे यांनी शिवतीर्थावर येत बाळसाहेबांना आदरांजली वाहिली.

पंकजांकडून युतीचा उल्लेख

आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनीही शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे भाजप-शिवसेना युतीचे श्रद्धास्थान असल्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. आज बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाची आम्हाला कमतरता जाणवते. त्यांच्या विचारांवर आम्ही चालत असून पुढेही चालत राहू, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply