पनवेल ः रामप्रहर वृत्त
अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावता यावा या हेतूने अबोली रिक्षा महिला संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी स्थापन केली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पहिला अबोली रिक्षा थांबा नवीन पनवेल येथील डी मार्ट येथे सुरू करण्यात आला. भारतीय जनता पक्षदेखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना या संघटनेचे पदाधिकारी व महिला सदस्यांनी एकमताने जाहीर पाठिंबा देण्याचे ठरले. या संदर्भातील पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी रविवारी (दि. 17) सुपूर्द केले. या वेळी प्रिंट पॉइंटचे संचालक संतोष सुतार उपस्थित होते.
महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण करून देणारी महाराष्ट्रातील पहिली संघटना म्हणून अबोली महिला रिक्षा संघटना कार्यरत आहे. पनवेल, कामोठे, कळंबोलीमध्ये 130 महिला या संघटनेच्या सदस्य आहेत. आमचे पदाधिकारी, सदस्यांनी एकमताने या विधानसभा निवडणुकीत कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा देण्याचे ठरवले असल्याचे संतोष भगत यांनी या वेळी सांगितले.
गेली 15 वर्षे पनवेलचे सक्षम आमदार म्हणून आमदार प्रशांत ठाकूर कार्य करीत आहेत. केलेली विकासकामे पाहता तेच पनवेलचे भविष्य घडवू शकतात, असा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच अबोली रिक्षा महिला संघटनेतर्फे त्यांना पाठिंबा देत असून भरघोस मतांनी निवडून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाहीही भगत यांनी या पाठिंबापत्रातून दिली आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …