Breaking News

कोकणातील 105 प्रयोगशील शिक्षकांचा गौरव

ठाणे ः प्रतिनिधी

कोकणातील पाच जिल्ह्यांत सर्जनशील, उपक्रमशील आणि नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून शिक्षण देणार्‍या 105 शिक्षक व संस्थांचा रविवारी

(दि. 17) गौरव करण्यात आला.

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यात रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कोकणातील शैक्षणिक विश्वातील बुद्धिमंतांचे स्नेहसंमेलनच भरले होते.

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून भाजप शिक्षण आघाडी कोकण विभागाच्या वतीने पुरस्कार दिले जात आहेत. यंदा शिक्षकांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श संस्थाचालकांना गौरविण्यात आले. या वेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, आयसीटीचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. आर. आर. देशमुख, विजय पां. जाधव, भाजप महिला आघाडीच्या माधवी नाईक, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, नीलिमा डावखरे, उद्योगपती कृतार्थ राजा, सचिन मोरे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पद्यश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष बी. डी. काळे यांना वसंत स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून कळवा येथील सहकार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एच. एस. भानुशाली, ठाणे येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदाशिव देवकर, मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार प्रा. बी. एन. पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 101 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.कोकणातील प्रयोगशील व नावीन्यपूर्ण कल्पना राबविणार्‍या शिक्षकांचा गौरव करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम सुरू करण्यात आला, असे निरंजन डावखरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमात डॉ. आर. डी. कुलकर्णी, डॉ. आर. आर. देशमुख यांच्याबरोबरच डॉ. भानुशाली यांनी मानवी जीवनातील शिक्षकांचे महत्त्व आवर्जून नमूद केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply