Breaking News

कुरिअर बॉयला लुटले

पनवेल : बातमीदार

कामोठे सेक्टर 18 भागात कुरिअरचे वाटप करण्यासाठी गेलेल्या कुरिअर बॉयच्या हातातील रोख रक्कम असलेले पाकीट मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी लुटून पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. कामोठे पोलिसांनी या लुटारूंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

तक्रारदार दीपक भोसले (19) हा तरुण कोपरखैरणे येथे राहण्यास असून, तो ब्ल्यू डार्ट या कुरिअर कंपनीच्या खारघर येथील कार्यालयात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. शुक्रवारी दीपक नेहमीप्रमाणे खारघर येथील कार्यालयातून डिलिव्हरीसाठी असलेले कुरिअर घेऊन बाहेर पडला होता. दिवसभरात त्याने 44 ऑर्डर्सची डिलिव्हरी केल्यामुळे त्याच्याकडे सुमारे 13 हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर सायंकाळी दीपक कामोठे सेक्टर 18मधील हार्मनी सोसायटीत कुरिअरची डिलिव्हरी करण्यासाठी जात होता. या वेळी तो कुरिअरद्वारे जमा झालेली रक्कम पाकिटात ठेवत होता. त्याचवेळी तिथे मोटरसायकलवरून तोंड बांधून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या एका लुटारूने दीपकच्या हातातील रोख रकमेचे पाकीट खेचून घेतले. या वेळी दीपकने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने दीपकला धक्का मारून तेथून पलायन केले. यानंतर दीपकने कामोठे पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात

आला आहे. लुटारूचा शोध सुरू आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply