Breaking News

रायगड किल्ला पर्यटकबंदीमुळे स्थानिक व्यावसायिकांवर संक्रांत

महाड : प्रतिनिधी

कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आहे. मात्र समुद्र किनारे आणि इतर ठिकणे सुरु असताना केवळ  गड, किल्ले पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे किल्ले रायगडावर पर्यटक येत नसल्याने येथील छोट्याछोट्या विक्रेत्यांवर आणि व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

किल्ले रायगड परिसरातील रायगडवाडी, हिरकणीवाडी, नेवाळी, परडीवाडी, टकमकवाडी येथील ग्रामस्थ सरबत, ताक, दही विक्री तसेच हॉटेल व्यवसाय, रायगड मार्गदर्शक असे व्यवसाय करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्ष किल्ले हे सर्व व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांना अर्थिक फटका सहन करावा लागला होता. आता पुन्हा किल्ले रायगडावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून रायगडावर पर्यटक येणे बंद झाले आहे. याचा परिणाम येथील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर झाल्याचे दिसून येत आहे.

किल्ले रायगड परिसरात सध्या एसटी बसेस जात नाहीत. खाजगी प्रवासी भाडेदेखील वाढले आहे. पर्यटक फिरकत नसल्याने रायगड आणि परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply