Wednesday , June 7 2023
Breaking News

मच्छीमारांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा

चंद्रकांत सरपाटील यांचे प्रतिपादन; विशाखापट्टणम येथे कार्यशाळा संपन्न

मुरुड : प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना वेव्ह रायडर (बोया)सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोळी बांधवांना सुरक्षित राहण्याबरोबरच  मासेसुद्धा मुबलक प्रमाणात मिळवता येतील. त्यामुळे त्यांना विकास साधणे सहज सोपे जाईल, असा विश्वास मुरुडच्या जय भवानी मच्छीमार सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत सरपाटील यांनी व्यक्त केला.  भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (इनकॉईस) व भूविज्ञान मंत्रालय आणि आंध्रा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील मच्छीमार बांधवांसाठी नुकतेच विशाखापट्टणम येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चंद्रकांतबाबू सरपाटील आपले अनुभव कथन करीत होते. मासेमारी करताना प्रगत तंत्रज्ञानाची साथ घेणे सर्व मच्छीमारांना आवश्यक असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.वेव्ह रायडर (बोया)द्वारे विशिष्ट सिग्नल आपल्या मच्छीमार सोसायटी तसेच मोबाईलमध्ये मिळतात व हवामानाची  आणि मासेमारी क्षेत्राची माहिती उपलब्ध होते, असे चंद्रकांत सरपाटील यांनी या वेळी सांगितले.या तीन दिवसीय कार्यशाळेत मासेमारीसाठी आलेले प्रगत तंत्रज्ञान, वेगवेगळे सिग्नल, समुद्राच्या तळाशी असणारी जैवसंपत्ती आदींबाबत विशेष माहिती देण्यात आली. तळा येथील जी. एम. वेदक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बी. जी. भवरे यांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. विशाखापट्टणम येथे झालेल्या या कार्यशाळेत देशाच्या विविध भागातील 200 मच्छीमार बांधव सहभागी झाले होते.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply