Breaking News

आगरी शिक्षण संस्थेत बालहक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती अभियान

खांदेश्वर : रामप्रहर वृत्त

येथील आगरी शिक्षण संस्थेत बालहक्क व सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. बुधवारी (दि. 20) खांदेश्वर पोलीस ठाणेअंतर्गत बालहक्क सप्ताहानिमित्त बालकांच्या (0 ते 18) मूलभूत हक्कांसंदर्भात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुप्रिमा फडतरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत बालकांच्या संदर्भात वेगवेगळ्या कालमान्वये, तसेच मुलांच्या संरक्षणाबाबत कोणती मदत मिळू शकते व इतर विषयांबाबत विस्तृत चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पो. ना. राजेंद्र कुवर यांची मोलाची मदत शाळेस झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य पंकज दिलीप भगत होते, तर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा तांडेल व इतर शिक्षक या वेळी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply