उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात रक्तदान शिबिर झाले. उरण महाविद्यालय, मी उरणकर ट्रस्ट, रोटरी क्लब उरण व माजी विद्यार्थी संघ उरण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज ठाकूर, मी उरणकर ट्रस्टचे अध्यक्ष विशाल पाटेकर आदींच्या हस्ते झाले.
या वेळी महात्मा गांधी मिशन वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. वृषभ भटोरा, डॉ. नवदीप कौर, डॉ. राजेश व त्यांची टीम यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी रक्त दिले पाहिजे, असे सांगितले व विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले.
या रक्तदान शिबिरात एकूण 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी राजेश शहा, प्रा. डॉ. पी. आर. कारूळकर, प्रा. व्ही. एस. इंदुलकर, प्रा. एच. के. जगताप, प्रा. एम. जी. लोणे, प्रा. आनंद गायकवाड, प्रा. डॉ. अरुण चव्हाण, प्रा. अनुपमा कांबळे, प्रा. रामकृष्ण ठावरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.