Breaking News

पनवेलमधील नाट्यगृहाचे अपूर्ण काम पूर्ण

नाट्यरसिकांनी मानले महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा व अधिकार्‍यांची कानउघडणी करून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे अपूर्ण काम व खराब झालेले काही भाग पूर्ण करून घेतले. त्याबद्दल नाट्यरसिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत असलेले वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह हे दुरवस्थेत असल्याचे व काही भाग पावसामुळे खराब होऊन रंग उडालेल्या अवस्थेत असल्याच्या तक्रारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे आल्या होत्या.  त्यांनी अधिकार्‍यांना तत्काळ कामाला लावून नाट्यगृहाची रंगरंगोटी करून घेतली व ज्या ठिकाणी अस्वच्छता होती त्या ठिकाणचा संपूर्ण परिसरदेखील स्वच्छ करून घेतला.

फडके नाट्यगृहात महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, शाळांचे स्नेहसंमेलन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम वेळोवेळी होत असल्याने अपूर्ण काम व खराब झालेल्या भागांमुळे येथे येणार्‍या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. याबाबत अनेकदा अधिकार्‍यांना सांगूनदेखील कामे होत नसल्याने काही जाणकार मंडळींनी याबाबत परेश ठाकूर यांना माहिती दिली. त्यावर ठाकूर यांनी प्रशासनाला तत्काळ कामास लावले व कामे पूर्ण करून घेतली.  ठाकूर यांच्या या कामाचे पनवेलच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply