अलिबाग : महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या पत्रकारांच्या संस्थेच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल जगन्नाथ पवार यांना दि प्राईड ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा हा गौरव होणार आहे.
अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात रविवारी (दि. 24) हा गौरव समारंभ-पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. त्यात राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रफुल्ल पवार हे गेली 20वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. वर्तमानपत्रांसह एका वृत्तवाहिनीसाठीही ते काम करीत आहेत. या पूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.