Breaking News

श्रद्धा कांबळे एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेचे सफाई कर्मचारी शरद सहदेव कांबळे यांची सुकन्या श्रद्धा शरद कांबळे ही नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झाली असून डॉक्टर झाल्याने महापालिका कर्मचार्‍यांमध्ये आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

मूळचे पनवेल शहराजवळील वडघर गावचे रहिवासी असलेले शरद कांबळे एकगरीब कुटुंबात जन्माला आले आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी शालेय शिक्षण आठवीपर्यंत कसेबसे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पनवेल नगर पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून 1990 साली रुजू झाले. आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागत असल्याची खंत मनात ठेवत आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यायचे, असे ठरवुन अहोरात्र मेहनत करून मुलींना शिकवायचा मानस उराशी बाळगून शरद कांबळे यांनी श्रद्धा हिच्या शिक्षणासाठी मेहनत घेऊन मेडिकलला अ‍ॅडमिशन घेतले, शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या के. व्ही. कन्या विद्यालयात झालेल्या श्रद्धाने अभ्यासात मेहनत घेऊन आपली  एमबीबीएस डिग्री पूर्ण केली.

मुलीच्या मेडिकल कॉलेजची फी एक सफाई कर्मचार्‍याला परवडणारी नव्हती मात्र लहान भाऊ आणि त्याच्या पत्नीने स्वतःचे दागिने गहाण ठेऊन मुलीची अ‍ॅडमिशन फी भरली, आजकाल भाऊ भाऊ एकमेकांचे वैरी होतात मात्र माझ्या भावाने मनाचे मोठेपण दाखवत मुलीच्या शिक्षणासाठी मदत केली त्याचा ऋणी आहे.

– शरद कांबळे, श्रद्धाचे वडील

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply