Breaking News

अर्बन हाटमध्ये हातमाग व हस्तकला महोत्सव

नवी मुंबई : सिडको वृत्त

सिडको अर्बन हाट येथे दि. 22 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर, 2019 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत हातमाग व हस्तकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध राज्यातल्या कारागिरांनी निर्मिलेल्या हातमागावरील पारंपरिक पद्धतीची वस्त्रप्रावरणे, तसेच विविध हस्तकला वस्तू प्रदर्शनार्थ आणि विक्रीकरिता मांडण्यात येणार आहेत. यामध्ये पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, केरळ, तमीळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक अशा विविध राज्यांतील कारागीर व कलाकार सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये मांडण्यात येणार्‍या हातमाग उत्पादनांमध्ये ड्रेस मटेरिअल, सुती व रेशमी साड्या, खादीचे कुर्ते व शर्ट, लेडिज टॉप, बनारसी साड्या, बेडशिट, गालिचे, कॅलिन, चिकन वर्क यांचा तर हस्तकला वस्तूंमध्ये तागाची उत्पादने, धातूकाम, चामड्याच्या विविध वस्तू, सुगंधी उत्पादने, कृत्रिम दागिने, विविध चित्रशैलींतील चित्रे यांचा समावेश आहे. अर्बन हाट येथील विविध महोत्सवांदरम्यान आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरतात. या महोत्सवाच्या कालावधीतही दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार सायं. 07.00 नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाची रंगत अधिक वाढणार आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply