Breaking News

अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात अनेक कामांचा शुभारंभ, भूमिपूजन यासह विविध कार्यक्रम शुक्रवारी झाले. त्या अंतर्गत चिपळे आणि खैरणे येथील रस्त्यांचे उद्घाटन, तसेच फणसवाडी आणि पालेबुद्रुक येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमही या वेळी राबविण्यात आले. भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रम आणि तळोजा येथील परमशांती धाम वृद्धाश्रम येथे अरुणशेठ भगत यांनी भेट देत ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. या वेळी विश्वजीत पाटील, अनिल कोकाटे आणि मयुर कदम यांनी करुणेश्वर वृद्धाश्रमात स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यामध्ये भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमार्फत चिपळे आणि खैरणे येथे रस्ते तयार करण्यात आले होते. या रस्त्यांचे उद्घाटन, तर फणसवाडी आणि पालेबुद्रुक येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे बेलनाका येथे वंदे मातरम जय भारत संघटनेच्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा शेळके, पनवेल महापालिका युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खानावकर, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, विश्वजीत पाटील, अशोक साळुंके, मयूर कदम, अनंत ढवळे, अशोक शेळके, रमेश पाटील, नगरसेवक संतोष भोईर, मोतीलाल कोळी, शाम भगत, पांडुरंग पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply