Breaking News

पाकिस्तानचा बोगसपणा! पदार्पणाचा विक्रम करणारा 2016पासून 16 वर्षांचाच?

कराची : वृत्तसंस्था

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून नसीम शाह या वेगवान गोलंदाजाचे पदार्पण झाले आहे. नसीमचे वय 16 वर्षे सांगण्यात येत असले तरी त्याच्या याच वयावरून आता वाद सुरु झाला आहे.

पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद 312 एवढी झाली आहे. नसीम शाहने 16 षटकांत 65 धावा दिल्या, मात्र त्याला एकही गडी बाद करता आली नाही. शाहने डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली होती, पण हा नो-बॉल असल्यामुळे वॉर्नरला जीवनदान मिळाले.

नसीम शाह याचे वय 16 वर्ष सांगण्यात येत असले तरी पाकिस्तानी वेबसाईट ’द डॉन’चा जुना लेख आता व्हायरल झाला आहे. वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू एण्डी रॉबर्ट्स यांचा हा लेख आहे. 16 वर्षांचा हा युवा वेगवान गोलंदाज मला फार आवडला आहे, असे रॉबर्ट्स म्हणाले होते. 7 ऑक्टोबर 2016 रोजीचा हा लेख आहे. आता 2019 साली म्हणजेच तीन वर्षांनंतरही नसीम 16 वर्षांचाच कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार साज सादीक यांचेही 2018चे एक ट्विट समोर आले आहे. ’पाकिस्तान सुपर लीगच्या क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणार्‍या 17 वर्षीय नसीम शाहच्या पाठीला दुखापत झाली आहे. तो सरावासाठी परतला. पीएसएलच्या चौथ्या मोसमासाठी तो फिट होण्याची अपेक्षा आहे’, असे ट्विट त्यांनी केले होते.

सादीक यांचे हेच ट्विट मोहम्मद कैफने रिट्विट करून निशाणा साधला आहे. भविष्य चांगले वाटत आहे, पण तो 16 सध्या वर्षांचा आहे. वयाने तो लहान होतोय, असा टोला कैफने लगावला.

शाहिद आफ्रिदीनेही केली होती हेराफेरी

पाकिस्तानी खेळाडूंवर वय चोरण्याचा आरोप याआधीही झाला आहे. शाहिद आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रातरही आपण वय चोरल्याचे मान्य केले आहे. शाहिद आफ्रिदीने वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, पण पदार्पण केले तेव्हा आपले वय 19 वर्ष होते, असे आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात सांगितले आहे. आफ्रिदीच्या काळात सोशल मीडिया नसल्यामुळे या गोष्टी समोर आल्या नाहीत, पण आता सोशल मीडिया प्रभावी असल्यामुळे नसीम शाहचे बिंग फुटले आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यावर कारवाई करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply